नागपूर :- नागपुरात महाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बजरंगदल कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याच्या विरोधात आंदोलन केले. या दरम्यान औरंगजेबाची कबर जाळण्यात आली. या कबरीवर कुराणातील आयात असल्याची अफवा वेगाने पसरल्याने आक्रमक झालेल्या मुस्लिम समाजाच्या जमावाने दगडफेक करीत वाहनांची ताेडफोड सुरू केली.
Video Player
00:00
00:00
महाल गांधीगेट शिवाजी पुतळा ते चिटणीस पार्क चौका दरम्यान दंगल सुरू झाली. दोन्ही बाजूने कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पोलिसांनी अश्रृधुराच्या नळकांड्यांचा मारा सुरू केला. तर जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला.
Video Player
00:00
00:00