संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अनव्ये वंचित व दुर्बल घटकातील बालकाकरिता स्थानिक स्वराज्य संस्था,अनुदानित, विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्य शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे.यासाठी 16 एप्रिल पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.पालकानो आपल्या पाल्याचे ऑनलाईन नोंदणी 30 एप्रिल पूर्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी संगीता तभाणे यांनी केले आहे.
31 डिसेंबर 2024 रोजी बालकांचे वय 6 वर्षे पूर्ण व 7 वर्षे 5 महिने 30 दिवस पेक्षा अधिक वय नसणारी बालके प्रवेशाकरिता पात्र असतील.
ऑनलाईन प्रवेश नोंदनीकरिता www.student. maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपल्या पाल्याची नोंदणी करावी.तालुक्यात गटसाधन केंद्रस्थळी मदत व तक्रार निवारन केंद्र तयार करण्यात आले आहे.
– 25 टक्के प्रवेशाकरिता ही कागदपत्र सादर करावे
– जन्माचे प्रमाणपत्र व वास्तव्याचा पुरावा सर्व घटकांना आवश्यक आहे.सामाजिक वंचित घटकातील पालकांचा जातीचा दाखला अनिवार्य आहे. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांचा एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र ,पाल्य व पालकाचे आधारकार्ड ,एचआयव्ही बाधित प्रभावित बालकाकरिता शल्यचिकित्साचे प्रमाणपत्र ,अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथल्याचे प्रमाणपत्र,कोवीड प्रभावित बालक सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र विहित कालावधीत आपल्या पाल्याची नोंदणी करावी.