संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहरात दरवर्षी पाण्याची टँचाई जाणवते व सर्वत्र पाणी मिळत नसल्याची ओरड सुरू होते यानुसार नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अथक प्रयत्नाला आलेल्या यशातून कामठी नगर परिषदला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत कामठी शहरात निर्माण करणाऱ्या तीन पाण्याच्या टाकी व पर्जन्य जलवाहिनी प्रकल्प हेतू चार वर्षांपूर्वी 5 मार्च 2019 ला 21.82कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता.या निधीतील पहिला टप्पा 5 कोटी 76 लक्ष 43 हजार रुपयांचा प्रथम टप्पा मंजूर होत हा निधी नगर परिषदला प्राप्त झाला होता त्यानुसार शहरातील अशोक नगर,कुंभारे कॉलोनी व इस्माईलपुरा येथे तीन टंकी पाणी योजनांच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली मात्र चार वर्षे चा काळ लोटूनही दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त न झाल्याने मागील तीन वर्षांपासून या तीन टंकी पाणी योजनेचे बांधकाम अर्धवट असून रखडलेले होते .ज्यामुळे नागरिकांना 24 तास शुद्ध पाणी मिळणार ही वलग्ना हवेतच विरणार का?असा प्रश्न नागरिकांत भेडसावत होता.यावर माजी पालकमंत्री व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी नागरिकाच्या विश्वासाला तडा न जाऊ न देता ,खऱ्या व जागरूक लोकप्रतिनिधीची भूमिका वर्तवून कामठी शहर वाढीव पाणी पुरवठा प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्याचा निधीसाठी राज्य शासनाकडे केलेल्या मागणीला यशप्राप्त करीत दुसऱ्या हफत्याचा 10 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला.
कामठी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी नगर परीषदला चार वर्षांपूर्वीच 5 कोटी 76 लक्ष 43 हजार रुपयांचा निधी मिळवून दिला व या निधींतुन शहरातील कुंभारे कॉलोनी, अशोक नगर व इस्माईलपुरा या तीन ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजित बांधकाम सुरू करण्यात आले व या तीन पाण्याच्या टाकीतुन संपूर्ण शहराला 24 तास शुद्ध पाणी मिळणार आहे मात्र दुसऱ्या टप्प्याचा निधी नगर परिषद ला प्राप्त न झाल्याने पाण्याच्या टाकी उभारण्याचा प्रश्न हा अधांतरी राहला होता.मात्र नागरिकांना भेडसावणारी पाण्याची टंचाई लक्षात घेत नागरिकांना 24 तास शुद्ध पाणी मिळावे यासाठी विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांनी दुसऱ्या हफत्याच्या निधीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला.या अथक प्रयत्नाला यशप्राप्त झाले असून राज्य शासनाने 29 मार्च 2023 रोजी कामठी शहर वाढीव पाणी पुरवठा प्रकल्पसाठी दुसऱ्या हफत्याचे 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
ज्यामुळे कामठी शहर वाढीव पाणी पुरवठा प्रकल्प हे आता लवकरच पूर्णत्वास होईल ज्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावणार नाही व नागरिकांना 24 तास शुद्ध पाणी मिळणार आहे.तर नागरी हितार्थ कामठी नगर परिषद ला दुसऱ्या हफत्याचा 10 कोटी रुपयाचा निधी मिळवून दिल्याबद्दल माजी पालकमंत्री व विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांचे कामठी शहरातील सर्व नागरिकांसह मुख्याधिकारी संदीप बोरकर,जलप्रदाय विभागाचे अभियंता अवी चौधरी,जलकर अधीक्षक रंजित माटे सह समस्त कर्मचारी गण तसेच भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल ,लाला खंडेलवाल, सर्वश्री माजी नगरसेवक कपिल गायधने, प्रतीक पडोळे,प्रमोद वर्णम, अजय पाचोली,,उज्वल रायबोले ,लालसिंग यादव,संजय कनोजिया आदींनी आभार व्यक्त केले.