नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत आगामी काळातील धार्मिक उत्सव तसेच मराठा समाज आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था अवाधित राहावी या दृष्टिकोनातून दिनांक २१/०१/२०२४ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल रोहोम यांच्या मार्गदर्शनात सावरगाव येथील शोभायात्रा मिरवणूक मार्गावर पोलीस ठाणे नरखेड येथील अधिकारी आणि अंमलदार, RCP पचक आणि होमगार्ड सैनिक यांच्या सह रूट मार्च घेण्यात आला. तसेच बस स्टैंड चौक सावरगाव येथे जातीय दंगा काबू योजनेवी रंगीत तालीम घेण्यात आली.
तसेच पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत दुरक्षेत्र सावरगाव येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव येथील मौलाना व मुस्लिम बांधव यांच्यासोबत चर्चा करून उद्या होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या, तदनंतर शोभायात्रेचे आयोजक यांच्या सोबत बैठक घेऊन कार्यक्रमा दरम्यान शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या निर्देशनाचे तंतोतंत पालन करण्याबाबत तसेच पोलीस प्रशासनास वेळोवेळी सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्या, सदर कार्यक्रमादरम्यान डीजे साऊंड चा वापर केला जाणार नाही दुसन्या धर्माच्या विरोधात नारेबाजी घोषणाबाजी करू नये याबाबत सूचना दिल्या, सामाजिक माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आक्षेपार्ह पोस्ट तथा मजकूर प्रसारित केला जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या.
पोलीस स्टेशन काटोल येथे आज दिनांक २१/०१/२०२४ रोजी बापू रोहम उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन काटोल येथील ४ अधिकारी तसेच २० कर्मचारी, पोलीस मुख्यालयातील आरसीपी पथक व २७ होमगार्ड पथक यांच्यासह काटोल शहर मध्ये राम मंदिर परिसर हत्तीखाना मस्जिद परिसर शनि चौक अआंबेडकर चौक बाजार चौक रूट मार्ग घेण्यात आला व आंबेडकर चौक मध्ये प्रात्यक्षिक करण्यात आले. रूट मार्च १२/१० ला सुरू करण्यात आले व पोलीस स्टेशन १३.४० ला रूट मार्च समाप्त करण्यात आला