यवतमाळ :- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी यवतमाळकरांचा आवडता रोटरी महोत्सव शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी ते सोमवार दि. २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत स्थानिक समता मैदान (पोस्टल ग्राउंड) येथे संपन्न होत आहे.
रोटरी क्लब ऑफ यवतमाळ व रोटरी सेवा ट्रस्ट द्वारा आयोजित या महोत्सवात २५० पेक्षा अधिक स्टॉल्स राहणार असून त्यात प्रामुख्याने स्टेशनरी, कॉस्मेटिक, गृहपयोगी वस्तू, फर्निचर, ड्रेस मटेरियल, आकर्षक क्राफ्ट मटेरियल, ऑटोमोबाईल उत्पादने, शैक्षणिक संस्था यासारख्या असंख्य उत्पादनांचे २०० पेक्षा अधिक स्टॉल्स या महोत्सवात राहणार असून, चवदार व्यंजनांचे ७० पेक्षा अधिक स्टॉल्स खवय्यांचे आकर्षण ठरणार आहे. अतिशय आकर्षक व आल्हाददायक अशा वातावरणात संपन्न होणाऱ्या या महोत्सवाला यवतमाळकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन आनंद प्राप्त करावा, असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. राजश्री धर्माधिकारी,सचिव आशीष गवेरशेट्टीवार तसेच रोटरी सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ सुरेंद्र पदमावार, सचिव अब्बास बॉम्बेवाला व प्रकल्प प्रमुख राजू पडगिलवार, शंतनू मुळे, यांनी केले आहे.