नागपूर :- रस्ता सुरक्षा अभियान २०२४ अंतर्गत दि. १५ जानेवारी २०२४ ते दि. १४.०२.२०२४ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता सुरक्षा अभियान अभियान राबविण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत या कार्यक्रमाचा समारोप समारंभ डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रमामध्ये अश्वती दोर्जे, सह पोलीस आयुक्त, नागपूर शहर, प्रमोद शेवाळे अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, नागपूर शहर यांचे उपस्थिीतीत शशिकांत सातव, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, नागपूर शहर यांचे उपस्थितीत अलंकार सभागृह, पोलीस मुख्यालय, नागपूर शहर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाची प्रस्तावना शशिकांत सातव, पोलीस उप आयुक्त, वाहतूक, नागपूर शहर यांनी केलो. प्रस्तावनेमध्ये त्यांनी पी.पी.टी. वे माध्यमातून मागिल २ महिन्यामधील तसेच सदर अभियानाचे कालावधी मध्ये त्यांनी नागपूर शहर मध्ये वाहतूक विभागा तर्फे घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वाहतूक मार्गदर्शनाचे कार्यक्रमावावत उपस्थितांना माहिती करून दिले. व उपस्थित आलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याकरीता मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामध्ये नागपूर शहरातील वेगवेगळया शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागपूर वाहतूक पोलीसांना नेहमी मदत करणारे जन आकोश संघटनेचे सदस्य तसेच वाहन अपघाताला प्रतिबंध करण्याकरीता उत्तम कारवाई करणारे रोडमार्फ फाऊंडेशनचे राजेश वाघ, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस मुख्यालय येथील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर शहर पोलीस रूग्णालय चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सदिप शिदि यांचे मार्गदर्शनाखाली शालीनीताई मेघे हिंगणा हॉस्पीटल येथील वैद्यकिय अधिकरी डॉ. नरेश गिल यांचे नेतृत्वाखाली उपस्थित वैदयकिय चमूने कार्यक्रमाला उपस्थित असलेले जवळपास ५०० पोलीस अंमलदारांची वैदयकिय तपासणी करून घेण्यात आली व त्यांना सिपीआर टूरिंग देण्यात आली.
पोलीस आयुक्त यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या विद्याथ्यांना मोटर वाहन कायदयाचे पालन करण्याबाबत अवगत करून दिले. तसेच तुम्ही शाळेत असतांना शाळेमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी जरी वाहन चालवित असतील तर हेल्मेटचा वापर करावे, शिट बेल्टचा वापर करावा यावर आग्रह धरावा असे मार्गदर्शन केले, विद्याथ्यांनी जर ही बाब शिक्षकांचे व इतर कार्यालयीन स्टाफला अवगत करून दिले तर नक्कीचपणे त्याचे पालन होणार यावाबत कुठलीही शंका नसल्याचे पोलीस आयुक्तांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले, विद्याध्यर्थ्यांनी आपले घरी आई-वडील, भाऊ-बहीण यांना सुच्दा मोटर वाहन कायदयाचे पालन करून नियमाप्रमाणे वाहन चालविण्यावाबत सांगितले तर त्यांचा फार मोठा प्रभाव समाजावर होणार याबाबत पोलीस आयुक्तांनी विश्वास व्यक्त केला, तसेच वाहतूक शाखा नागपूर शहर यांनी सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबाबत प्रसंशा केली.
कार्यक्रमा मध्ये वाहतूक विभागात काम करणारे अंमलदार व इतर संघटनेचे प्रतिनिधी यांना प्रसंशापत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे शेवटी रस्ता सुरक्षा समारंभाचा समारोप म्हणुन वाहतूक विभागा तर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी रॅलीला पोलीस आयुक्त,सह पोलीस आयुक्त यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून शहराचे मुख्य रस्त्यातुन वाहतूक सुरक्षा रॅली काढण्यात आली, मोटार सायकल रॅलीमध्ये २०० पोलीस कर्मचार्यानी हेल्मेटसह सहभाग घेतला होता. रॅलीमध्ये बुलेट रायडर संस्थेचे सुध्दा उत्साही सदस्यांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन हिवरे, पोनि, वाहतूक सोनेगाव व आभार प्रदर्शन जयेश भांडारकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक, नागपूर शहर यांनी केले. सदर कार्यक्रम नागपूर शहर वाहतूक विभागातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांचे अंमलदाराने केलेल्या प्रयत्नामूळे कार्यक्रम यशस्वी पार पडला.