नागपूर :- आज शुक्रवार दिनांक18-11-2022 ला सकाळी 11 वाजता जागतिक रस्ते अपघात बळी स्मरण दिवसाचे निमित्य साधून वर्धा रोड वरील चिंचभवन बस स्टॉप जवळ आर के ग्लास परिसरात रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यासंबंधित विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
प्रथमोपचार अभावी कोणत्याही अपघाग्रस्त जखमी चा अल्पकाळात जीव जाऊ नये याकरिता केव्हाही,कुठेही कुणाचाही रस्ते अपघात झाल्यास त्या अपघातग्रस्त जखमी ला सुवर्णकाळात हॉस्पिटल मध्ये भरती करणे,त्वरित प्रथमोपचार मिळवून देणे आणि जखमीचा जीव वाचविणे तसेच धान्यवादाची अपेक्षा न करता तेथून निघून जाणे करण आम्ही आपल्याच देशबंधावना मदत करीत आहोत आणि हे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे,हे ईश्वरीय कार्य आहे अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनात रुजविण्याचा आमचा प्रयत्न असतो असे प्रतिपादन रोडमार्क फाउंडेशन चे राजुभाऊ वाघ यांनी केले. चिंचभवन परिसरातील हॉटेल,चहा,पान टपरी चालक, फळ, फुल,भाजी किक्रेते,मेडिकल स्टोअर्स,काचेचे दुकान,बिछायत केंद्र,कर्तनालाय, टेलरिंग, चप्पल शिवणारे,ढाबा चालक, किराणा दुकानदार,दुचाकी ग्यारेज चालक ,स्थानिक जेष्ठ नागरिक,स्थानिक युवक असे किमान 300 छोट्या मोठ्या दुकानदारांची नोंदणी करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात चिंचभवन परिसरात लोकसहभागातुन रस्ते अपघात आपत्ती व्यवस्थापन केंद्र सुरू करण्याचे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. वरील उपक्रम आय रस्ते,रोडमार्क फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येईल, कार्यक्रमाचे संचालन उमरव बोबडे यांनी केले तर आभार दीपक जांभुलकर यांनी केले, बठकीअंती उपस्थित मान्यवरांना वाहतूक नियम पाळणे आणि अपघातग्रस्त जखमीचा जीव वाचविण्याची शपथ देण्यात आली,आणि आज जागतिक अपघात बळी स्मरण दिवस असल्याने मृतकांना श्रद्धांजली देण्यात आली अशी माहिती रोडमार्क फाउंडेशनचे अध्यक्ष राजुभाऊ वाघ यांनी दिली.
यावेळी दुकानदार सागर कोरडे, अतुल इंदाने,प्रणित मोहोड, संजय बोबडे,अशोक मोहोड, रत्नशील थुल, दिलीप तायडे, शरद देव,तुषार महाकाळकर, कैलाश वऱ्हाडकर, वैशाली सोनुने आणि समस्त दुकानदार बंधू उपस्थित होते.