वाढत्या महागाईने सर्वसामान्य चे आर्थिक बजेट बिघडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 17:- जीवनावश्यक असलेले पेट्रोल, डिझेल गॅस व खाद्यपदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असून दिवसेंदिवस वाढीव महागाईवर असलेले घरगुती सिलेंडर,खाद्यतेल ,किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तुची वाढीव किमती आकाशाला भिडल्या असल्याने गरीब व सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
एकाच वर्षात सिलेंडरच्या किमतो जवळपास 400 रुपये आणि खाद्यतेल 50 रुपयाने महाग झाले आहे.पेट्रोल 112 रुपयांच्या वर तर डिझेल 100 रुपयांपर्यंत मजल मारत आहे.घरगुती गॅस चे भाव मागील सहा महिण्यात दुप्पट झाले आहेत .दिवसेंदिवस असलेल्या महागाईचा आलेख पाहिल्यास मागील पाच वर्षात महागाई मोठ्या पटीने वाढली असून जीवनावश्यक वस्तूंचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.त्यातच पेट्रोल डिझेल ची दरवाढ ही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे.याला त्वरित आळा न घातल्यास नागरीकावर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षी कोरोना या रोगाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात खाद्यपदार्थ सहित इतर जीवनावश्यक वस्तूची देवाण घेवाण मोठ्या प्रमानात कमी झाली यामुळे काही मोठ्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ , जीवनावश्यक वस्तूची मोठ्या प्रमाणात साठवणूक केली आज याच गोष्टीचा फायदा घेत असून आपल्या मर्जीने प्रत्यक्ष बाजारपेठेत जादा दराने वस्तूंची विक्री करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विधवा महिलांना प्रशिक्षण पूर्व स्वयंरोजगार प्रशिक्षण

Fri Jun 17 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 17:-कोविड 19 संसर्गजन्य आजारामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्व स्वयंरोजगार व व्यावसायिक प्रशिक्षण ओळख कार्यक्रम कामठी पंचायत समिती कार्यालयात पार पडला. याप्रसंगी सहाय्यक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी कार्यक्रमात उपास्थित महिलांना मार्गदर्शन करून सदर संधीचा योग्य फायदा घेऊन आयुष्यात उंचठिकान गाठावे असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com