संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येथील संत रविदास मंदिर परिसर रविदास नगर येथे रविदास नगर च्या समस्त समाज बंधू ,सर्व महिला कार्यसहयोगी तसेच नवयुवक कार्यसहयोगीच्या वतीने रविवारी 12 फेब्रुवारीला क्रांतिकारी संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविदास परिषद मध्यप्रदेश चे राष्ट्रीय अध्यक्ष रामकिशोर चव्हाण,माजी जिल्हाधिकारी व राज्य सचिव महाराष्ट्र शासन किशोर गजभिये, संत रविदास समाज समिती छिंदवाडा (म.प्र.)अध्यक्ष ऍड. श्याम अहिरवार उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमा अंतर्गत रविवारी दुपारी 12 वाजता रांगोळी स्पर्धा ,दुपारी 3 ते 5 पर्यंत पूजा-अर्चना आरती,सायंकाळी 5 ते 7 पर्यंत लहान बालक बालीकांचे नृत्य स्पर्धा,अतिथी स्वागत समारोह तर सायंकाळी साडे सात वाजता समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे .तेव्हा या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येत नागरिकांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे..
@ फाईल फोटो