महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा – तहसीलदार अक्षय पोयाम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे.महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे.जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्याच्या दैनंदिन जिव्हाळ्यांच्या प्रश्नांचा ज्यांच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळें त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करुन नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन कामठीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित महसूल दिन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

जसे की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसे 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे आर्थिक वर्ष मानले जाते. यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. 1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परीक्षण करण्याचा दिवस आहे.

शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे.जमीन, महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौंणखणींज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही,विविध खात्याची थकीत वसुली,पाणी वापर परवानगी,रस्ता देणे, अडवलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी परवानगी देणे,सर्व प्रकारच्या निवडणुका,जनगणना,आर्थिक गणना,कृषी गणना,आधार कार्ड,विविध सामाजिक योजना,रोजगार हमी योजना आदी महसूल खात्यांमार्फतच राबविले जातात.

लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जवाबदारी महसूल विभागाची आहे.त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात .म्हणून सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी दुय्यम निबंधक अनिल भिवगडे, नायब तहसीलदार राजाराम बमनोटे,नायब तहसीलदार उपेश अंबादे,नायब तहसीलदार अमर हांडा,नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर, तसेच सर्व मंडळ अधिकारी,तलाठी,कर्मचारी गण आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन अव्वल कारकून व्ही पी मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती गोरलेवार यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशभरातील शाळांमध्ये ११.२३ लाख शौचालयांचे निर्माण खा. कृपाल तुमाने यांच्या प्रश्नावर शिक्षण मंत्र्यांची माहिती

Tue Aug 1 , 2023
नवी दिल्ली :- देशभरातील शाळांमध्ये ११ लाख १३ हजार शौचालयांचे बांधकाम करण्यात आले असून त्यात ५ लाख ४७ हजार शौचालये मुलींसाठी तर १ लाख ५० हजार शौचालये सीडब्ल्यूएसएनसाठी बांधण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ते म्हणाले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com