Ø अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी
Ø 7 व 8 ऑक्टोबरला नागपूर व चंद्रपूरला आढावा
नागपूर :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे दिनांक 7 व 8 ऑक्टोबर रोजी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
विखे-पाटील हे 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता नागपूर येथे येतील व दुपारी 3.30 पासून काटोल तालुक्यातील कोंढाळी, पाणवडी, येरला, पारडशिंगा येथील नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी करतील. सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पिक पाहणी पीकविमा, गौण खनिज वहिवाट रस्ते, 7/12 संगणकीकरण व लम्पी आदी विषयांवर आढावा घेतील.
दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी मंत्री विखे-पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, साठवण, भिसी, वहानगाव या चिमूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील.
सायंकाळी 6 वाजता नागपूर येथील रेशमबाग मैदानावर आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो च्या समारोप सभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विखे-पाटील उपस्थित राहतील व तद्नंतर रात्री 9 वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.