मुंबई :- म्युनिसिपल कामगार एकता युनियन ( सी आय टी यू ) तर्फे मुंबई येथे राज्यस्तावरील बैठक पार पडली. बैठकीला कॉ. राजेंद्र साठे व कॉ. प्रीती मेश्राम प्रामुख्याने नागपूर येथून उपस्थित होते. कोरोणा काळात कंत्राटी तत्वावर काम केलेल्या कोविड योध्याना नोकरीत प्राधान्य देण्यासोबत त्यांना कायम तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचे मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. १९ डिसेंबर रोजी नागपूर विधान सभेवर शेकडो कोवीड योद्धयानी मोर्चा काढून आरोग्य मंत्री -तानाजी सावंत यांना निवेदन सादर केले असता यावर तात्काळ निर्णय घेऊन कोविड योद्धा व आशा स्वयंसेविका यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. परंतु त्यावर विचार करण्यात न आल्यामुळे २ मार्च पासून सुरू होणाऱ्या बजट अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी २ मार्च रोजी मुंबई मंत्रालयावर विशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चात राज्यातून कोविड काळात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, टेक्निशियन, सफाई कर्मचारी, एम्बुलांस ड्रायव्हर हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची खात्री केली आहे.