*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड*
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
● नॉन-फेयर रेव्हेन्यू अंतर्गत विविध उपाय उपाय योजनांची माहिती दिली
नागपूर :- खासदार औद्योगिक महोत्सवाचा एक भाग म्हणून नागपुरात तीन-दिवसीय अँडव्हान्टेज विदर्भ प्रदर्शन आणि परिसंवादाचे आयोजन नागपूरच्या विद्यापीठ परिसरात करण्यात आले आहे. २७ जानेवारी पासून हे प्रदर्शन सुरु झाले आहे. व्यापार, वाणिज्य आणि गुंतवणुकी संबंधी विषयांचा उहापोह करणाऱ्या या प्रदर्शनात महा मेट्रोने स्टॉल लावले असून याला नागौरकारांनी चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
या प्रदर्शनात नागपूर मेट्रोच्या नॉन-फेयर रेव्हेन्यू बॉक्स अंतर्गत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आहे. प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारा महसूल नॉन-फेयर रेव्हेन्यू बॉक्सच्या श्रेणीत येतो आणि या सर्व बाबींचा उल्लेख या स्टॉल मध्ये केला आहे. यात प्रामुख्याने को-ब्रॅण्डिंग ऑफ मेट्रो स्टेशन, ट्रेन रॅपिंग, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट सारख्या उपक्रमांची माहिती येथे देण्यात आली आहे. या शिवाय मेट्रो पिलरच्या मध्ये जाहिराती करता असलेली सोय, स्टेशन वरील टीव्ही स्क्रीन वर जाहिरात देण्यासंबंधी असलेली तरतूद अश्या विविध बाबींचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत व्यावसायिक तत्वावर पीपीपी मॉडेल अंतर्गत एकूण ६० लाख चौरस फूट क्षेत्रफळावर निवासी आणि वाणिज्यिक संकुल निर्माण करण्याचे प्रावधान आहे. या अंतर्गत झिरो माईल स्टेशन येथे ६,००० चौरस मीटर, धरमपेठ कॉलेज येथे १,७५२ चौरस मीटर, उज्वल नगर येथे ५,५३२ चौरस मीटर, प्रजापती नगर येथे १,८७४ चौरस मीटर आणि सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे ७,२०२ चौरस मीटर पार्किंग आणि व्यावसायिक बांधकामाच्या प्रकल्पांवर नागपूर मेट्रो काम करीत आहे.