संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – अखिल भारतीय मांग गारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश व्दारे डॉ. प्रशांत नारनवरे आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे हयांना निवेदन देऊन समाजाच्या विकासा च्या दुष्टीने मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील मांग गारोडी समाजाचे जातीचे दाखले मागील २०११ प्रमाणे शासकीय जी. आर. काढुन १९५० च्या अटी रद्द करूण देण्यात यावे, लोक शाहिर आण्णा साठे महामंडळ वाढीव निधी देऊन समाजास उधोग धंधे वाढीस शासनाने मदत करावे, कारण कोरोना काळात या समाजाचे उद्योग डबगाईस आले आहेत. अनूसुचित जाती निघी वाढवुन समाज विकासाचे प्रमाण देण्यात यावे. शैक्षणिक स्वायता देण्यात यावे. आणि ब्रिजलाल गायकवाड राष्ट्रीय अध्यक्ष मांग गारोडी समाज वर्धा यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार देण्यात यावा. अश्या विनंती चे निवेदन देऊन मागणी करण्या त आली. याप्रसंगी अरूण गाडे, डॉ.एन.व्ही. ढोके, डॉ सुरेश चवरे, डॉ सिद्धार्थ गायकवाड, समाज कल्या ण विभागीय आयुक्त नागपूर डॉ. सरोज आगलावे आ दी प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदन देताना अखिल भारतीय मांग गारोडी दलित आदिवासी भटके संघर्ष समिती चे नेवालाल पात्रे, अतुल पात्रे, विनोद लोंढे, राधुनाथ पात्रे, किशोर शेंडे, आनेश गायकवाड, आदेश भिसे उपस्थित होते.