नागपूर :- वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपुर्वक फ़ेरफ़ार करून होणा-या वीजचो-यांची माहिती असणा-यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणा-याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, असे महावितरणतर्फ़े कळविण्यात आले आहे
महावितरणने वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या 10 टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असून नागरिकांनी वीजजोरीची माहिती लेखी, इमेल अथवा तोंडी कळवावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वीजचोरीची माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून या सुविधेचा लाभ घेत जागरूक नागरिकांनी वीजचोरी रोखण्यात महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
वीजचोरीची माहिती केवळ लेखी, ईमेल अथवा तोंडी कळवावी
महावितरणच्या संकेतस्थळावरून अथवा मोबाईल ऍपवरून वीजचोरीची माहिती देण्याची कुठलिही सुविधा महावितरणकडुन देण्यात येत नसल्याचेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आल्याने नागरिकांनी त्यांना अवगत असलेल्या वीजचोरीची माहिती महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये अथवा फिरते पथक यांना केवळ लेखी, ईमेल अथवा तोंडी कळवावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे.