संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 25 फूट उंचीच्या पुतळ्याला समितीने दिली तत्त्वता मान्यता
-दोन हजार आसन क्षमता असलेले ऑडोटोरियम उभारण्याची सूचना
कामठी :- महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील आंतररराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात पुतळा उभारण्यासंदर्भात नवी दिल्ली येथील पुतळा प्रतिकृती अंतिम करण्याकरिता समितीचा पाहणी दौरा पाच व सहा एप्रिल रोजी सुनियोजित होता.
महामानवं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक तयार होत आहे.350 फूट उंचीच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम डॉ राम सुतार गाजियाबाद यांच्याकडे बनविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे विचाराधीन आहे.आज दिनांक 6 एप्रिल रोजी गाजियाबाद येथील प्रसिद्ध मूर्तिकार राम सुतार यांच्या मूर्ती शिल्प कारखान्यातील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 25 फूट उंचीच्या पूर्णाकृती प्रतिकात्मक पुतळ्या ची पाहणी दौरा समिती द्वारे करण्यात आला.
यावेळी मूर्तिकार डॉ राम सुतार व आनंद सुतार यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात उंच शिल्पाकृती संदर्भात प्रस्तुतिकरण सादर केले.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि रा दिंगळे यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या स्मारकाच्या बांधकामाची माहिती समिती समोर दिली.समितीच्या सदस्यांनी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती शिल्पाला तत्त्वता मान्यता दिली.व लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाचे काम पूर्ण करावे ही अपेक्षा व्यक्त केली.तसेच स्मारक परिसरामध्ये दोन हजार आसन क्षमता असलेले वातानुकूलित औडोटोरियम करण्यात यावे अशी सूचना दिली.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त नारनवरे यांनी समितीच्या सदस्यांचे आभार मानले.
याप्रसंगी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करीत असताना माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्यासह पूज्य भदंत राहुल बोधी,वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर,भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रिय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर,रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे महासचिव राजेंद्र गवई,विधानसभाचे सदस्य संजय बन्सोडे,विधानसभेच्या सदस्या यामिनी जाधव,मूर्तिकार डॉ राम सुतार,आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव दि स डिंगळे,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त नारनवरे,सहाय्यक आयुक्त अनिल अहिरे, कक्ष अधिकारी देशमुख व मोठया प्रमाणात अधिकारी उपस्थित होते.