नागपूर :- पारडी येथील सुभान नगरमध्ये सोमवारी (ता. २२) सकाळी फुटपाथ खचले व त्यामुळे येथील मलवाहिनी बाधित झाली. याबाबत तात्काळ दखल घेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मनपाद्वावारे तात्काळ रस्त्यावर बॅरीकेडिंग करण्यात आले. तसेच लकडगंज झोनतर्फे पथदिवे देखील हटविण्यात आले आहेत. आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे लकडगंज झोन तर्फे मलवाहिनीचे सांडपाणी दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. फुटपाथच्या खाली असलेली ९०० डायमीटरची मलवाहिनी खचल्याने १० फुट खोल मोठा खड्डा तयार झाला. यासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री. संजय माटे यांनी सांगितले की, खड्ड्याभोवती सँड बॅग्स लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
सुभान नगर येथील मल वाहिनीची दुरूस्ती सुरू
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com