सभोवतालच्या परिसरात अडकलेला मांजा काढा, अनर्थ टाळा

– कचरा संकलन गाडीवर नायलॉन मांजा जमा करण्याचे मनपाचे आवाहन 

नागपूर :- संक्रात आणि पतंग यांचे नाते सर्वश्रुत आहे. मकरसक्रांतीचा सण हा नागपुरात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त शहरात उडविण्यात आलेल्या पतंग आणि मांजा झाडे, इमारती, विद्युत खांब, विद्युत तारेवर मांजा अडकलेला असतो. हा मांजा पक्ष्यांसाठी तसेच व्यक्तींसाठी घातक ठरू शकतो. मांजात अडकून कुठलाही अनर्थ होऊ शकतो, हाच अनर्थ टाळण्यासाठी आपल्या सभोवतालच्या परिसरात अडकलेला मांजा काढण्यासाठी नागरिक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

आपल्या सोसायटी मधील बिल्डीग, इमारतीच्या छतावर तसेच परिसरातील झाडे/ झुडपे इत्यादीवर अडकून असलेला मांजा शक्य असल्यास काढून मनपास योग्य विलहेवाटी करीता सुपूर्द करावा. मांजा काढून योग्य विल्हेवाट लावण्याकरीता मनपा मुख्यालयात डस्टबिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मनपाच्या कचरा संकलन गाडीवर नायलॉन मांजा जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली तरी नागरिकांनी सहकार्य करीत मांजा जमा करावा असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी सांगितले की, शहरातील सर्व नागरीक/सेवाभावी संस्था यांना आवाहन करण्यात येते की, इमारती, झाडे, विद्युत खांबांवर अडकून असलेला नायलॉन मांजा काढून मनपाच्या मुख्य कार्यालयास तसेच कचरा संकलन वाहनास देण्यात यावा, जेणेकरून त्याची तत्काळ विल्हेवाट लावणे शक्य होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूरला सौर जिल्हा करण्यासाठी महावितरणचा पुढाकार

Wed Jan 17 , 2024
– वीज बिलात बचत, पर्यावरणाचे रक्षण नागपूर :- नागपूर जिल्ह्याला सौर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील बहुतांश घराच्या छतावर सोलर रुफ टॉप असावे यासाठी ग्राहकांसोबत थेट संवाद साधून त्यांना यासाठी प्रोत्साहीत करण्याची मोहीम महावितरणे सुरु केली आहे. वीज ग्राहकांच्या फ़ायद्यासोबतच पर्यावरण पुरक असलेल्या या मोहीमेत सहभागी होत अधिकाधिक नागपूरकर वीज ग्राहकांनी घराच्या छतावर सोलर रुफ टॉप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!