१८ वर्ष पूर्ण होताच मतदार नोंदणी करा – तहसीलदार डॉ. हंसा मोहने 

– युवा संवाद व महसूल सप्ताह निमित्य किट्स मध्ये डॉ. हंसा मोहने यांचे प्रतिपादन

रामटेक :- कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायंस (किट्स) रामटेक मध्ये युवा संवाद व महसूल सप्ताह निमित्य ४ आगस्टला तहसील कार्यालय रामटेकचा वतीने नवीन मतदार नोंदणी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत केला. या वेळी तहसीलदार डॉ. हंसा मोहने, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार महेश कुलदीवार, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे , विद्यार्थी विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. पंकज आष्टणकर, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

तहसीलदार डॉ. हंसा मोहने यानी विद्यार्थ्यांसी युवा संवाद साधताना म्हणाल्या की निवडणुक हा लोकशाहिचा मोठा उत्सव आहे. यात सर्व मतदातानी हिरिहिरिने भाग घ्यावा. त्यानी पंचायती राज्य जसे ग्रामपंचायत, पंचायत समिति, जिल्हा परिषद, विधान परिषद, लोकसभा यांचा रचनेची व कार्याची माहिती दिली. नायब तहसीलदार महेश कुलदीवार मार्गदर्शन पर म्हणाले की ज्यांचे १७ वर्षे वय पूर्ण झाले आहे व जुलै, ऑक्टोबर २०२३ मध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होतील त्यानी मतदार फार्म नंबर ६ वर नोंदनी करु शकतात. मतदार नोंदनीसाठी व्होटर हेल्पलाईन अँप किंवा ऑफलाईन द्वारे नोंदनी करू शकतात. नोंदनी करीता आधार कार्ड जरूरी आहे. ७ नंबर फार्म मध्ये नाव वगळने व ८ नंबर फार्म मध्ये नावात बदल करू शकता. प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे मार्गदर्शन पर म्हणाले की १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करावी व मतदाता कार्ड तयार करावे. निवडनुक विभागाचे जय झोडापे, पवन जगताप यानी नवीन मतदारा करिता फॉर्म वाटप फार्म केले. डॉ. पंकज आष्टणकर यांनी प्रस्तावना, सेजल चौरसिया यानी संचालन व सागर जीवने यानी आभार प्रदर्शन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परवडणारे वैश्विक शहर म्हणून नागपुरची नवी ओळख – उपमुख्यमंत्री

Sun Aug 6 , 2023
– विविध विकासकामांचा शुभारंभ नागपूर :– पायाभूत सुविधांसोबतच अत्याधुनिक आरोग्य, शैक्षणिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे नागपूर हे वेगाने विकसित होत आहे. मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई ही वैश्विक शहरे आहेत पण ती परवडणारी नाहीत. ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर असलेले वैश्विक शहर म्हणून नागपूर जागतिक पटलावर येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शहरातील विविध विकास कामांसोबतच कमाल चौक परिसरात अत्याधुनिक अग्निशमन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!