नागपूर :- नागरिकांच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींचा निपटारा व अनुषंगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
त्यानुसार दि.13 जानेवारी रोजी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे