यवतमाळ :- भारतीय नौदलात अग्निवीर पुरुष व अग्निवीर महिला ०२/२०२५, ०१/२०२६ व ०२/२०२६ बॅच पदाची भरती घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीबाबतची सविस्तर माहिती www.joinindiannavy.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी दि.10 एप्रिल पर्यंत करता येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करून नौदलात अग्निवीर पदाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.