भंडारा :- माजी सैनिक यांच्या करीता 136 इंफन्ट्री बटालीयन (प्रादेशिक सेना) ईको मध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत भरती सुरु होत आहे. Sol GD-87 पदे (महाराष्ट्रचे रहवासी करीता) तर Clk GD 06 पदे, शेफ कॉमुनिटी 01 पद, हॉऊस किपर- 01 पद, ब्ल्याक स्मिथ -01 पद, मेस किपर- 01 पद, आर्टिसन -01 पद अनुक्रमे ऑल इंडिया बेसीस वर भरावयाची आहेत.
ही भरती प्रक्रीया 109 इंफन्ट्री बटालीयन (टी. ए.) कोल्हापुर, महाराष्ट्र येथे राबीविण्यात येणार आहे. ईच्छुक माजी सैनिक तसेच मिनिस्ट्री ऑफ एनव्हार्यरमेन्ट ॲन्ड क्लायमेट चेंज आणि महाराष्ट्र वन विभागातील निवृत महीला कर्मचारी फक्त यांच्याकरीता ही भरती आहे याची नोंद घ्यावी. माजी सैनिक करीता वयोमर्यादा सैन्यामधून निवृत होऊन पाच वार्षापेक्षा जास्त नसावे. अधिक माहिती करीता जिल्हा सैनिक कार्यालयाला भेट दयावी किंवा 9168168136 या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, आकाश अवतारे, यांनी केले आहे.