– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवार (ता.१५) रोजी उपद्रव शोध पथकाने ८१ प्रकरणांची नोंद करून ३९ हजार ३०० रुपयाचा दंड वसूल केला आहे.
शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २५ प्रकरणांची नोंद करून १०,००० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ४०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून २००० रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ११ प्रकरणांची नोंद करून १२५०० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/ टाकावू कचरा टाकणे/ साठवणे प्रथम या अंतर्गत ०१ प्रकरणाची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २७ प्रकरणांची नोंद करून रु ५४०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०८ प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
*प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या २ प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०२ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयाचा दंड वसूल केला. तसेच रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत धरमपेठ झोन येथील श्री. वैभव नंदेश्वर बिल्डर दाभा तसेच नेहरूनगर झोन येथील मे. हरीश एन्क्लेव, रामकृष्ण नगर दिघोरी यांच्याकडून प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशा एकुण ०८ प्रकरणांची नोंद करून रु 50,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.