सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ७६ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर :-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.०२) रोजी उपद्रव शोध पथकाने ७६ प्रकरणांची नोंद करून ३९,४०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत २६ प्रकरणांची नोंद करून १०,४०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून २०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०७ प्रकरणांची नोंद करून २८०० रुपयांची वसुली करण्यात आली.

रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी जनावरे धुणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ४००० रुपयांची वसुली करण्यात आली.चिकन सेंटर, मटण विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.

वर्कशॉप, गरज व इतर दुरुस्तीचे व्यावसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १००० रुपयांची वसुली करण्यात आली.

सार्वजनिक रस्ता फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकाम मलबा टाकून कचरा टाकणे/साठवणे, प्रथम ४८ तासात हटविण्याची नोटीस देऊन न हटविणे या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास २५ प्रकरणांची नोंद करून रु ५००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ८ प्रकरणांची नोंद करून रु ८००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीस दलाचा 'रेझिंग डे' उत्साहात साजरा

Wed Jan 3 , 2024
नागपूर :- दिनांक ०२/०१/२०२४ रोजी नागपूर ग्रामिण पोलीस दलातर्फे रेडिंग डे’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नागपूर ग्रामीण जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस रेझिंग दिनानिमित्य विविध शाळांमध्ये कार्यक्रम राबविले, शाळेतील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे कामकाजाविषयी तसेच विविध शस्त्राविषयी माहिती देण्यात आली, कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस स्थानकात असणारी विविध शस्त्रे पाहून विद्यार्थी हरखुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com