सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (15) रोजी शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून 25,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 10 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 100/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 6,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/ साठवणे या अंतर्गत्त 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 /- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 13 प्रकरणांची नोंद करून 2,600/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 9 प्रकरणांची नोंद करून 9,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत अनिल अग्रवाल यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत मे. गौरी अर्पांटमेट बिल्डर्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. जाधव किराणा स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. निखारे स्विटस यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. ५,०००/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. मंगळवारी झोन मे. दिवा फॅशन अँड लाईफस्टाइल एक्झीबीशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 5 प्रकरणांची नोंद करून रू. 35,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुसद प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Wed Oct 16 , 2024
यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील वसंतपुर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा वसंतपुर येथे पुसद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्याहस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणू शासकीय आश्रमशाळा वसंतपुरचे मुख्याध्यापक बलराज राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे उपस्थित होते. सर्वप्रथम महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com