सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 50 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (12) रोजी शोध पथकाने 50 प्रकरणांची नोंद करून 39000 रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 500 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400 रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 5 प्रकरणांची नोंद करून 5500 रुपयांची वसुली करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 22 प्रकरणांची नोंद करून 4400 दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 5 प्रकरणांची नोंद करून 5000 दंड वसूल करण्यात आलेला आहे. हरित लवाद यांनी दिलेल्या दि. 03.07.2017 च्या आदेशाप्रमाणे व दिलेल्या निर्देशाप्रमाणे विवाह सभागृह या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 15000 रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. सिता निवास व मे. नारंग रेस्टॉरेंट यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 25,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 2 प्रकरणांची नोंद करून रू. 25,000/- दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सावन सोमवार को हुए रामेश्वरम शिवजी के दर्शन

Tue Aug 13 , 2024
– आज भगवान जगन्नाथजी की सजेगी झांकी नागपुर :- सावन के चौथे सोमवार पर आज वर्धमान नगर के राधा कृष्ण मन्दिर में रामेश्वरम के शिवजी व स्फटिक मणि के दर्शन का लाभ शिव भक्तों ने लिया। फूलसेवा, प्रसादसेवा कैलाशचंद अग्रवाल, प्रहलादराय खेतान, पवनजी गोयल ने की। राधा कृष्ण मंदिर में सावन झूलोत्सव पर विभिन्न सुंदर झांकियां निर्मित की जा रही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com