सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 13 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. शुक्रवार (20) रोजी शोध पथकाने 13 प्रकरणांची नोंद करून 21,600/- रुपयाचा दंड वसूल केला. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु.400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी जनावरे बांधणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 10,000 रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 1 प्रकरणांची नोंद करून 200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 8 प्रकरणांची नोंद करून 8,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन झोन अंतर्गत मे. सोमप्रकाश तोलाराम यांनी बांधकाम साहित्य चेबंर मध्ये टाकल्याबद्दल यांच्या विरूध्द मनपा नियमांचे उल्लंघन केल्याबददल रू. 10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. बालाजी स्विट मार्ट यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 2 प्रकरणांची नोंद करून रू. 15,000/- दंड वसूल केला

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

308 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती आदेश निर्गमित

Sat Sep 21 , 2024
– मागील 20 वर्षातील सर्वात मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना वारसा हक्काचा लाभ नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग अंतर्गत सेवानिवृत्त/वैद्यकीय अपात्र/कामावर असतांना मृत्यु पावलेल्या स्थायी सफाई कामगारांच्या वारसदारांना /नामनिर्देशीतांची नियुक्ती शासन निर्णयानुसार तात्काळ करण्याचे निर्देश उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेला दिलेले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेव्दारे ज्या कर्मचाऱ्यांने नामनिर्देर्शन करीता संपुर्ण दस्तावेज सादर केले व विहित मुदतीत नामनिर्देर्शन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!