नागपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज राजभवन येथे आगमन झाले, त्याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी पूजा पाटील उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. शनिवार दिनांक 2डिंसेबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 111 व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.