नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील दिव्यांगांच्या गोळाफेक स्पर्धेमध्ये रवी आणि यामिनी सहारे यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले. हनुमान नगर क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महावविद्यालयात दिव्यांगांच्या विविध स्पर्धा सुरु आहेत. अस्थिव्यंग प्रवर्गातील 200 खेळाडूंनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला आहे.
मतिमंद प्रवर्गातील गोळाफेक स्पर्धेत मुलांमध्ये ज्ञानेश्वर खेडकर ने रौप्य आणि अजय ने कांस्य तर मुलींमध्ये अश्विनी खुरंगे आणि कृतीका शिंदपुरे यांनी रौप्य व कांस्य पदक पटकाविले.
मॅरेथॉनमध्ये कार्तिक सहारे, सोहेब शेख, साहिल आश्राम आणि मुलींमध्ये सारिका गावंडे, पूनम खोटले, जिजाई आहेरक यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. 12 ते 15 वर्ष वयोगटाच्या 100 मीटर दौडमध्ये राम प्रथम प्रणय थोटे द्वितीय आणि विक्की कौरते आला. मुलींमध्ये सारीका गावंडे ने प्रथम, मिना ने द्वितीय व अक्षरा मडावी ने तृतीय क्रमांक पटकाविला.
कॅरम स्पर्धा मध्ये वैभव देशमुख व साहेब शेख विजेते आणि आशिष नागदिवे व सुजल गौरकर उपविजेते ठरले. मुलींमध्ये राणी व श्रावणी विजेते तसेच श्रवेता शेंडे व मधुर गेडाम उपविजेते ठरले. मॅरेथॉनमध्ये अंध प्रवर्गातील मुलांमध्ये प्रथम योगेश रंगारी, द्वितीय प्रविण करतुके आणि तृतीय सावंत गोरेवार ठरले.
पूर्णतः अंध प्रवगातील बुद्धिबळ स्पर्धेत मुलांमध्ये इम्तीयाज खान ने प्रथम, अर्पित पटेल ने द्वितीय आणि दिपक बोडखे ने तृतीय क्रमांक प्राप्त केला. मुलींमध्ये वैष्णवी नेहारे ने प्रथम तर रागीनी तन्नेवार ने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. अंध प्रवर्गातील क्रिकेट स्पर्धेत नागपूर अ संघाने ब्लाईंड बॉइस संघावर 32 धावांनी विजय मिळविला.
स्पर्धेचे बक्षिस वितरण श्री संजय लुघे, धनंजय उपासणी, संजय ठाकरे, उमेश वारजुरकर, सुहासनी क्षिरसागर, माधुरी दुर्गे, कविता कुकुलवार, दिपक थापेकर, दिलीप भोयर, सौरभ क्षिरसागर, अक्षय बोरीकर, जनक साहु यांच्या हस्ते करण्यात आले.