– पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा
नागपूर :- महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्तरपुर, मध्य प्रदेश यांच्या अधिपत्याखाली ८ ते ११ डिसेंबर दरम्यान आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. निवड झालेला नागपूर विद्यापीठाचा संघ स्पर्धेसाठी शुक्रवारी रवाना झाला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेतून या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची निवड प्रगती महिला महाविद्यालय भंडाऱ्याचे संचालक डॉ. शालिक राठोड, बॅरि. वानखेडेचे डॉ. राजेंद्र राउत, हरीभाऊ आदमने कॉलेजचे डॉ. दिनेश किमता, नुतन आदर्श महाविद्यालयाचे डॉ. बेबी तांबे, निमंत्रित सदस्य नीलेश मते यांचा समावेश असणाऱ्या समितीने केल्याची माहिती नागपूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सुर्यवंशी यांनी दिली.
विद्यापीठ संघ पुढीलप्रमाणे- निकीता खोब्रागडे, प्रवीणा पारसे, सैनम कोरी (तिन्ही हरीभाउ आदमने कॉलेज, सावनेर), सुरभी पाठक, अरिबा शेख(दोन्ही एलएडी कॉलेज), मिताली पाटील(पीजीटीडी नागपूर), मैथिली जाधव(इन्स्टि. ऑफ सायंस), लक्ष्मी घुग्गुसकर, तनुश्री कुहिकर(जीएच रायसोनी कॉलेज), कांचन रघटाटे(जीएस कॉलेज, वर्धा), रितीशा दुबे(नबीरा महाविद्यालय, काटोल), महिमा दुबे(कमिन्स कॉलेज). राखीव खेळाडू- मिताली डुले(संताजी महाविद्यालय), वनिता खोब्रागडे(साईबाबा आर्ट्स -सायंस कॉलेज), तन्वी गोतमारे(केझेडएस विज्ञान कॉलेज), साना खान(अंजुमन गर्ल्स कॉलेज), एकता सारकर(एमएके महिला कॉलेज, हिंगणघाट), दिव्यानी वाळके(नबीरा कॉलेज), तन्वी देढे(शिवाजी सायंस कॉलेज), मृणालिका कुंभारे(वायसीसी अभियांत्रिकी कॉलेज).