भरत टाऊन येथे विवाहित तरुणीवर बलात्कार

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 1 :- येरखेडा ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भरत टाऊन येथे आपल्या घरी निवांत झोपेत असलेल्या विवाहित तरुणीच्या घरात शिरून तिला बाजूच्या घरात नेऊन बळजबरीने जबरी संभोग करीत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना शेजारच्या एका अविवाहित तरुणाने केले असून ही घटना गतरात्री घडली.सदर घटनेसंदर्भात पीडित फिर्यादी तरुणीने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अजय मरावी वय 22 वर्षे रा भरत टाऊन कामठी विरुद्ध भादवी कलम 376 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित 29 वर्षीय महिलेवर शेजारी राहणाऱ्या 22 वर्षीय आरोपी अविवाहित तरुणाची वक्रदृष्टी होती.तेव्हा या वक्रदृष्टीतून सदर पीडित महिला ही आपल्या घरी झोपली असता गतरात्री तिच्या घरात शिरुन तिला बळजबरीने बाजूच्या घरात नेऊन लैंगिक अत्याचार केला.यासंदर्भात पीडित महिलेने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

महाराष्ट्र दिनी मनपा आयुक्त व प्रशासकांच्या हस्ते ध्वजारोहण

Mon May 2 , 2022
नागपूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने रविवारी (१ मे) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील हिरवळीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी मनपा आयुक्त यांच्या ‘तपस्या’ या शासकीय निवासस्थानावर आयुक्त तथा प्रशासक  राधाकृष्णन बी. यांनी ध्वजारोहण केले. यानंतर मनपाच्या राजशिष्टाचारानुसार त्यांना अग्निशमन विभागाच्या पथकाद्वारे मनपा मुख्यालयात आणण्यात आले. मनपा मुख्यालयात ध्वजारोहणानंतर अग्निशमन विभागाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!