29 मे ला रणजीतबाबू देशमुख यांचा “अभिष्टचिंतन समारंभ”

सावनेर :- सावनेर विधानसभा क्षेत्राचे 2-3 दशकापेक्षा जास्त प्रतिनिधित्व करणारे विकास महर्षी, रणजीतबाबू देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दिनांक 29 मे 2023 ला सायं. 5.00 वाजता स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स, अरविंद इंडो पब्लिक स्कूल, हेटी (सुर्ला) तह. सावनेर येथे त्यांचा “अभिष्टचिंतन समारंभ” आयोजित करण्यात येत आहे.

रणजीतबाबू देशमुख हे सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्याचे विविध खात्याचे मंत्री असताना त्यांनी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध क्षेत्रात अमुलाग्र आणि परिणामकारक बदल हा विकास कामांच्या माध्यमातून केला. ग्रामविकास, सिंचन, कृषी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, औद्योगीकरण, रोजगार निर्मिती, रस्ते विकास, सांस्कृतिक इत्यादी ज्यामुळे सावनेर क्षेत्राची प्रतिष्ठा राज्यातच नव्हे तर देशातही उन्नत करण्यासाठी त्यांनी अतुलनीय आणि अथक प्रयत्नांची पराकाष्टा केली, हे सर्वश्रुतच आहे. अशा या कर्तुत्ववान लोकनेत्याचा वाढदिवस सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने साजरा करण्यात येत असल्याने एक प्रकारे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे होईल.

नागरिकांनी या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कार समितीतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कटारिया ऍग्रो कम्पनीला वारंवार लागणाऱ्या आगीची चौकशी ची मागणी!

Mon May 29 , 2023
– शनिवारच्या आगीत पुन्हा 4 कामगार जखमी? वाडी :- सोनेगाव निपाणी ग्रा.प हद्दीत असलेली दिशांत भारत कटारिया यांच्या मालकीची कटारिया ऍग्रो बायोमास प्रॉडक्ट्स कंपनी शनिवारी रात्री पुन्हा एकदा आगीच्या विळख्यात सापडल्याने परिसरात खळबळ व चिंता दिसून आली असून ग्रा.प सदस्य विनोद लंगोटे यांनी या कम्पनिच्या कार्य व व्यवस्था प्रणालीच्या चौकशीची मागणी केली आहे. वाडी नप चे अग्निशमन अधिकारी रोहित शेलारे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com