गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने रानी विरांगना दुर्गावती मडावी जयंती साजरी

नागपूर :- गोंडवाना साम्राज्याची कुशल शासक, संघर्षाची गाथा,गोंड वंशाची रानी वीरांगना महारानी दुर्गावती मडावी यांची 499 वी जयंती 5 ऑक्टोबर 2023 ला आदिवासी नगर नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिला मरसकोल्हे अध्यक्ष नागपूर शहर महिला प्रकोष्ठ यांनी मातृशक्ती ला प्रेरणात्मक मागदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिनेश सिडाम अध्यक्ष नागपूर शहर यांनी रानी वीरांगना महारानी दुर्गावती यांच्या इतिहासावर प्रकाश टाकूण महिलांना संघर्षाचे महत्व पटवून देवून प्रत्येक महिलांच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत निर्माण केली. प्रमुख पाहुणे गंगाताई टेकाम जिल्हाध्यक्ष नागपूर,विणा मडावी, राजेश इरपाते, प्रशिल कोडापे, विजय मसराम, विजय आतराम तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होते तसेच प्रमिला मरसकोले , आदिश्री कोकुर्डे, सिमा उईके, उमा सरोते, सुधाकर परतेकी, क्रिष्णा सरोते, बबीता मरसकोल्हे , विमल तोडासे, पदमा पंधराम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मिना कोकुर्डे व आभार प्रदर्शन भाग्यश्री आडे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बंटी चौधरी यांचा २६ ऑक्टोबर ला आत्मदहन करण्याचा ठाम निर्णय

Sat Oct 7 , 2023
नागपूर :- शिवसेना भारतीय कामगार संघटना माथाडी आणि जनरल कामगार युनियन के नागपूर उपजिल्हाप्रमुख बंटी चौधरी ने २६ ऑक्टोबर को आत्मदहन करने का इशारा दिया है । Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com