रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन येथे पोलीस निरिक्षकपदी एच.एन. यादव हे रुजु झाले असुन त्यांनी नुकताच कार्यभार सांभाळलेला आहे. ते यापुर्वी खापरखेडा व त्यानंतर नागपुर येथे कार्यरत होते. गेल्या काही महीन्यांमध्ये रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या धाडसी चोऱ्यांवर ते विशेषतः लक्ष देणार असल्याचे यावेळी मुलाखती दरम्यान पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगीतले.