रामटेक :- श्री नरेंद्र तिडके कला व वाणिज्य महाविद्यालय रामटेक येथे सविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ निमित्त संविधान प्रस्ताविके चे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे तत्वज्ञान, मानविय मूल्य, आदर्श, व संविधान निर्मितीच्या उद्देश स्पष्ट करण्याक रिता संविधान उद्देशिकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे . यास्तव भारतीय राज्यघटने बाबत नागरिकात व विद्यार्थ्यात जागरूकता वाढविण्यासाठी भारतीय संवि धानाच्या अमृत महोत्सवी वर्षात दि.२६ नोव्हेंबर २०२४ ला महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान उद्देशिका वाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्या लयाचे प्राचार्य डॉ. शरद पोकळे होतें. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उद्देशिकाचे वाचन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुनील कठाणे यांनी केले. याप्रसंगी महावि द्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कान्द्री-माईन येथे संविधान दिन उत्साहात साजरा
संविधानच्या माध्यमातुन देशात लोकशाही नांदत आहे. या संविधानाच्या माध्य मातुन भारत हा जगातील लोकतंत्र देश म्हणुन ओळ खला जातो यासाठी सर्वानी संविधानाचे काटेकोर वाचन करावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे हयांनी केले ‘माझे संविधान माझा अभिमान’ तसेच ७५ व्या संविधान वर्धापन दिना निमित्त या उपक्रमांतर्गत प्रकाश हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कांद्री माईन येथे ‘संविधान दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान वर्ग १२ वी ची विद्यार्थिनी ईशा नाईक, अंजली कठौते, तनिशा राऊत, वर्ग ५ ची विद्यार्थ्यीनी भाग्यश्री भलावी हिने सुद्धा संविधानाची कलमे सांगितली. वर्ग ११ ची शिक्षिका अनिता खंडा ईत यांनी संविधान व संविधानाची गरज या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कामिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच ५ प्रश्न विचारले व बक्षीस वितरण करण्यात आले. कार्य क्रमाचे अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय? व त्याची आपणास गरज काय ? या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी संवि धानाची निर्मिती, अधिकार, कर्तव्य, संविधानाची अमलबजावणी यासंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन प्रत्येक घरी संविधान असणे आवश्यक असल्याचे सांगुन त्याचे वाचन करण्याचे आवाहन केले लाईव अर्थ सेवा संरक्षण ट्रस्ट कडुन शाळेला संविधान उद्देशिका भेट देण्यात आली विद्यार्थ्यां करिता प्रश्न मंजूषा कार्यक्रम घेण्यात आला यात अष्टाग घरडे , मयंक कठौते साहिल खोब्रागडे, सम्मयक खोब्रागडे ,नेहाल ठाकरे, अंचीत उईके प्रथम आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामिनी पाटील यांनी तर आभार अशोक नाटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विजयकुमार लांडे, प्रशांत सरपाते, सुचिता बिरोले, ज्योत्स्ना मेश्राम, वसंतराव ठकरेंले, प्रभाकरजी खंडाते व शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.