जय श्रीराम च्या गजराने दुमदुमली राम नगरी   

रामटेकात श्रीराम वन गमन काव्य यात्रेचे ठिकठिकाणी पुष्प वर्षावनी भव्य  स्वागत..
श्रीलंकेवरून  जाणारी श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रेचे रामटेक मार्गे निघाले अयोध्या येथे प्रस्थान करिता
रामटेक :  श्रीलंकेवरून  जाणारी श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रेचे रामटेक मार्गे अयोध्या येथे निघाले  प्रस्थान  करायला. श्रीलंकेवरून अयोध्या येथे जाणारी श्रीराम वनगमन पथकाव्य यात्रा होळीच्या दिवशी दुपारी शहरातील शीतलवाडी परिसरात दाखल झाली . चौका चौकात मुख्य स्थळी सुंदर गेट लावण्यात आले होते.याठिकाणी यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले . त्यानंतर शहरात यात्रा बसस्थानक , डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक , शास्त्री चौक इत्यादी ठिकानी पुष्प वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले. सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले . महाशिवरात्रीला श्रीलंकेवरून यात्रा प्रारंभ झाली  ही यात्रा अयोध्यानगरीत दाखल होईल . श्रीरामचरण पादुका व श्रीराम प्रतिमेसोबत श्रीलंकेच्या रामेश्वरम येथून  नागपूरवरून रामटेक शहरात ही यात्रा दाखल झाली . जयस्वाल पेट्रोल पंप जवळून यात्रेची सुरुवात करण्यात आली.यात्रेत यावेळी आमदार  आशिष जयस्वाल , प्रसाद किंमतकर ,परम पूज्य महाराज ,  आदींची उपस्थिती होती . यावेळी  पिंटू  शर्मा , शेखर बघेले ,प्रकाश कस्तुरे, पी.टी.रघुवंशी,अनुराग दुबे , पियूष भरणे , भूषण नानोटे, मंगल गुघे,प्रतीक राघोर्ते , मोनु रघुवंशी, सपन जयस्वाल,शुभम जयस्वाल,अमोल गाढवे , तनस गुप्ता,महेश शर्मा,जगदीश मित्तल, शंभूनाथ मनोहर , सह  श्रीराम वनगमन यात्रा समन्वय समिती पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Sun Mar 20 , 2022
नागपुर – पोलीस स्टेशन पारडी, नागपूर शहर अपराध क्रंमाक 84/2022 कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीने मृतक इसम नामे सोनु काशीराम बंसकर वय 40 वर्ष रा. इटारसी मध्येप्रदेश याचा डोक्यात सिमेंट ब्लॉक टाकुन खुन केल्यावरून नमुद गुन्हा पारडी येथे नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा गुन्हेशाखा युि नट क्रं.05, नागपूर नी घटनेचेगांभीर्य लक्षात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!