नागपूर :-बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती ह्यांनी लखनऊ येथे बसपाचे राष्ट्रीय समन्वयक व राज्यसभा खासदार इंजि. रामजी गौतम ह्यांना महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मुख्य प्रभारी म्हणून नियुक्त केले. त्यांच्या सोबत उत्तर प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष भीम राजभर व युवा नेते मनीष आनंद यांचीही प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी दिली.
महाराष्ट्राचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून ऍड. संदीप ताजणे तसेच महाराष्ट्राचे सेक्टर प्रभारी म्हणून ऍड सुनील डोंगरे (विदर्भ), डॉ हुलगेश चलवादी, प्रशांत इंगळे, मनीष कावळे यांना त्याच पदावर कायम ठेवले. अशीही माहिती उत्तम शेवडे यांनी दिली.