नागपूर :- भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्ष तसेच प्रशासकीय कार्यप्रभारीपदी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. भाजपमध्ये गेल्या साठ वर्षांपासून विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदार नोंदणीसह निवडणूक विषयाशी संबंधिक विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. पुढेही त्यांच्या माध्यमातून मतदार नोंदणी व निवडणूक संदर्भातील अन्य कामे योग्य प्रकारे पूर्ण व्हावीत, या दृष्टीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल रमेश दलाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. कोठेकर, शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, शहर संघटन महामंत्री विष्णू चांगदे तसेच सर्व आमदार व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
भाजप महानगर उपाध्यक्षपदी रमेश दलाल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com