पुरुषोत्तममासा निमीत्त श्रीराम मंदिर टिळक रोड महाल येथे रामकथा व पुरुषोत्तम यागाचे आयोजन

नागपूर :-श्रीराम मंदिर टिळक रोड महाल नागपूर येथे बुधवार दि.19 जुलै 2023 ते मंगळवार दि. 25 जुलै 2023 पर्यंत पुरुषोत्तम मासा निमित्त रोज दु्. 4.00 वा. प्रवचनकार श्रीकांत गोडबोले यांचे रामकथा होणार आहे.

प्रवचनकार श्रीकांत गोडबोले यांनी नागपूरातील विविध मराठी दैनिकांमध्ये काम केलेले आहे काही वर्षां पासून ते पूर्ण वेळ अध्यात्माकडे वळलेले आहे त्यांनी महाराष्ट्र व महाराष्टा बाहेर विविध ठिकाणी भागवत,रामकथा,साईबाबा, तुकाराम महाराज,ज्ञानेेशर महाराज, या विषयांवर प्रवचन केले आहे. तसेच त्यांनी 3 वर्षे 3 महिने 3 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा देखील पूर्ण केली आहे. व माणगाव (कोकण) ते गरुडेेशर (गुजरात) या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या ठिकाणी देखील त्यांनी पायी वारी केली आहे.

दि.25 जुलै 2023 रोजी स.10.00 वाजता मंदीरात पुरुषोत्तम याग होईल व दि 26 जुलै 2023 रोजी स.10.00 वाजता पूर्णाहुति होईल व नंतर महाप्रसाद वितरीत केल्या जाईल.

तरी समस्त भक्तानी रामकथेचा व पुरुषोत्तम यागाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर टिळक पुतळा, महाल यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स नागपूर ने केला बालरोगशास्त्र अकादमीच्या माजी अध्यक्षांचा सत्कार

Tue Jul 18 , 2023
नागपूर :- अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स नागपूर ही इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्समधील अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे. अकादमी ऑफ पेडियाट्रिक्स नागपूर यांनी बाल आरोग्य, बालरोग , बंधुत्व आणि संस्थेसाठी त्यांच्या अपवादात्मक योगदान आणि समर्पित सेवेबद्दल अकादमीच्या माजी अध्यक्षांचा सत्कार केला. अध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे आणि टीम AOP 2023 यांनी 16 जुलै 2023 रोजी चिटणविस सेंटर येथे डॉक्टर्स डे सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com