अयोध्येतील राम मंदीर हे भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात – देवेंद्र फडणवीस

• राम ललाचे दर्शनाला सर्व सोबत जावूया

• प्रतिष्ठापना सोहळयाच्या थेट प्रक्षेपण सोहळ्यात सहभाग

• रामनगर येथील मंदीरात राम दर्शन

नागपूर :- अयोध्येत भव्य राम मंदीरातील गर्भगृहात राम लला विराजमान होत आहे. हा सर्व भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही भारताच्या नव्या अस्मिता पर्वाची सुरुवात आहे. समाजातील सर्व घटकांना समान अधिकार मिळण्याचा क्षण असल्यामुळे आपण सर्व राम ललाच्या दर्शनाला अयोध्येला जावूया, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अयोध्या येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदीराचे लोकार्पण होवून गर्भगृहात राम लला विराजमान होणाऱ्या क्षणाच्या साक्षिदार होत असल्याचा अभिमान आहे. हा क्षण रामनगर येथील राम मंदीराच्या परिसरात लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवर बघण्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे आयोजित या कार्यक्रमास उत्तर भारतीय र्मोच्याचे सुरेंद्र पांडे, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, शैलेश जोगळेकर, संजय बंगाले, जयप्रकाश गुप्ता, शाम पत्तरकीने, प्रणिता फुके, अश्विनी जिचकार, संदीप गवई आदी उपस्थित होते.

भारतीय इतिहासात 22 जानेवारी हा महत्तवाचा दिवस असल्याचे सांगतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने झाली. तसेच स्वातंत्र्यानंतर यासाठी संकल्प करण्यात आला. राजकीय स्वातंत्र्यासोबत आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळे अयोध्या येथे भव्य राम मंदीर पूर्ण झाले आहे.

कारसेवकांचे बलिदान तसेच कोठारी बंधू यांनी भगवा प्रस्तापित करण्यासाठी केलेला संघर्ष अतुलनिय होता. सर्वांच्या त्यागातून व बलिदानातून आज भव्य राम मंदीर निर्माण झाले आहे. त्यामुळे राम ललाचे दर्शन घेण्यासाठी सर्वांना अयोध्येला जायचे आहे. त्यासाठी आवश्यक व्यवस्था करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रारंभी रामनगर येथील मंदीराला भेट देवून श्रीरामाचे दर्शन घेतले. अयोध्या येथील श्रीराम मंदीरात राम ललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेचा क्षण सर्वांना अनुभवता यावा तसेच या क्षणाचे साक्षिदार होता यावे यासाठी या परिसरात एलएडी स्क्रीनद्वारे या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सुमारे तीन तास चाललेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. यावेळी कारसेवक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उत्तर भारतीय र्मोचा तसेच औषधी विक्रेता संघ व विविध सामाजिक संस्थांतर्फे करण्यात आला होता. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपारिक नृत्य करुन राम जन्मभूमी उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अदित्री, संजनाची सुवर्ण ‘हॅट्ट्रिक’, खासदार क्रीडा महोत्सव : जलतरण स्पर्धा

Mon Jan 22 , 2024
नागपूर :- अदित्री पायसी आणि संजना जोशी यांनी खासदार क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील आणि 17 वर्षावरील वयोगटात सुवर्ण पदकाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. रविवारी अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलावामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटात अदित्री पायसीने 100 मीटर बटरफ्लाय, 100 मीटर फ्री स्टाईल आणि 200 मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर संजना जोशीने मुलींच्या 17 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!