संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
जवाबदारीची आठवण करून देणारा म्हणजे पर्व रक्षाबंधन होय – डॉ संजय राठी
कामठी ता प्र 11 :- विविध जाती धर्मातील नागरिकांना एकतेच्या पवित्र भावनेने रेशीम सूत्रात बांधून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा पर्व म्हणजे रक्षाबंधन पर्व असल्याचे मत राजयोगिनी ब्रह्माकुमारी प्रेम लतादीदी यांनी रनाळा येथील सद्भावना भवनात आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले दरम्यान डॉ संजय राठी यांनी जवाबदारीची आठवण करून देण्याचा पर्व म्हणजे रक्षाबंधन असल्याचे मौलिक मत डॉ संजय राठी यांनी व्यक्त केले रनाळा येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयचे वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता .याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्मकुमारी प्रेमलता दीदी यांचे हस्ते मान्यवरांना राखी बांधण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ संजय राठी,डॉ मंजू राठी, नारायण अग्रवाल,सेवक उईके, विमलताई साबळे, वैशाली डोनेकर, अनिता मॅडम, शेषराव अढाऊ, परशराम नागपुरे,हरिहर गायधने,घनश्याम चकोले,नेमचंद बावनकुळे, मजहर इमाम भाई, पटेल भाई तसेच रणाळा ग्रा प चे सरपंच सुवर्णा साबळे, उपसरपंच आरती खुल्लरकर , ग्रा प सदस्यगन आदी सह पदाधिकरो व मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती,
कार्यक्रमात प्रेमलता दीदी यांनी रक्षाबंधनाचे पर्व समजून सांगितले व विविध जाती धर्माच्या नागरिकांनी रेशम बंधनाचे महत्व पाळून समाज सेवा करण्याचे आव्हान केले . प्रेमलता दीदी व सर्व दीदींच्या हस्ते सर्व बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीलू दीदी यांनी केले संचालन वंदना दीदी यांनी केले व आभार प्रदर्शन घमश्याम चकोले यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी गनमान्य नागरिक उपस्थित होते.