संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 11:- भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला व बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन हा पर्व आज कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या पर्वानिमित्त चिमुकल्या बहिणीपासून ते मोठ्या बहिणीनि आपल्या भावाला राखी बांधून भावाची ओवाळणी केली. यावेळी भावाने बहिणीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असल्याचा प्रण घेत गवाही दिली.
रक्षाबंधना निमित्त तालुक्यातील बाजारपेठा ह्या राख्यानी सजलेल्या होत्या.विविध प्रकारच्या रंगबेरंगी आणि आकर्षक राख्या बाजारात उपलब्ध झाल्या होत्या.यात सुमारे दहा रुपयांपासून ते साडेतीनशे रुपयापर्यंतच्या राख्या बाजारात उपलबद्ध होत्या.राख्यांचे रूप बद्लले असले तरी अजूनही फुलांच्या नक्षीवर खडे, कुंदन, विणकाम इत्यादी सजावट करून तयार केलेल्या राख्याला अनेकांनी पसंती दर्शविली.एक साधा रंगीत दोरा आणि त्यामध्ये असलेलं एका बककलाच्या आकाराचं पटीनंम , अक्रोलीक वा धातूपासून बनविलेल्या डिझाइन अशा साध्या राख्या अधिक प्रमाणात खरेदी करताना दिसल्या. त्यात ओम, स्वस्तिक, सूर्य अशा अनेक पक्षी पहावयास मिळाले त्याचप्रमाणे मोटू, पतलु, डोरेमोन, छोटा भीम, बालगणेश, शिंनच्यान या सारख्या कार्टून आणि स्पिनर राख्या नि सुद्धा बाजारपेठ सजलेली दिसली.