– जनसंवाद रथ यात्रेचे सावनेर-कळमेश्वर
– विधानसभा क्षेत्रात जोरदार स्वागत
– ‘धनुष्य बाणा’चा प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकजूट
सावनेर :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा गुढी पाडव्याचा सण हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मुहूर्ताचा मानला जातो. रामायण काळात गुढी पाडव्याच्या दिवशी रावणाच्या कुशासनातून प्रभु श्रीरामांनी आपल्याला मुक्त केले. हा दिवस म्हणजेच चैत्र प्रतिपदेचा होता. त्यानंतरच रामराज्यातील जनतेने घरा घरात विजयाच्या पताका फडकविल्या त्यात रामटेक सुद्धा एक होते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीं तर महाराष्ट्रात शिवेसेना प्रमुख तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली रामटेक लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याची संधी मला मिळाली आहे. प्रभु श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेकच्या हितार्थ विकासाचे काम करून राम राज्याची विजयाची गुढी आपण उभारू असा विश्वास महायुतीचे उमरेडचे माजी आमदार तसेच महायुतीचे रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार राजू देवनाथ पारवे यांनी व्यक्त केले.
सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील जनसंवाद रथ यात्रेची सुरुवात मंगळवारी गौंडखैरी येथून प्रचार दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. जनसंवाद रथ प्रचार यात्रेत भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार, भाजप नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, मनोहर कुंभारे, कळमेश्वर शहर अध्यक्ष धनराज देवके, तालुका अध्यक्ष संदीप उपाध्ये, रमेशजी मानकर, सावनेर अध्यक्ष मंदार मंगळेसह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन एकता मंच, रासप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलतांना राजू पारवे म्हणाले की, रामटेक भूमीवर प्रभू श्रीरामांचे पाऊले पडली आहे. या भूमीचे कार्य करण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले आहे. रामटेक निवडणुकीच्या प्रचारात गावा गावांतून मिळत असलेला प्रतिसादातून येणारे यश हे आपल्या सर्वांचे असणार.
पहिल्याच क्रमांकाच्या धनुष्य बाणाची बटन दाबा
गेल्या दहा दिवसांपासून मी जनसंवाद रथ यात्रेतून प्रत्येक ग्रामवासींयाची भेट घेत आहे. गावातील महिला, पुरुष, तरुण भर उन्हात माझ्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे असताना मला दिसून येत आहे. कुणी रांगोळी काढली तर कुणी पुष्पवर्षाव करत आहेत. गावात स्वागताचे औषण हेच आपण दिलेल्या आशिर्वादाची पावती आहे, त्यामुळे मी भारवलो आहे. रामटेक क्षेत्रात येणाऱ्या सावनेर व कळमेश्वर विधानसभेतील मुलभूत तसेच विकासाभिमूख कार्य करण्यासाठी मला आपली साथ लागणार. रामटेकवासीय नेहमीच शिवसेनेसोबत राहिली आहे. येणाऱ्या 19 तारखेला आपण पहिल्याच क्रमांकाच्या धनुष्य बाण चिन्हाची बटन दाबून पुन्हा भगवा फडकविण्याची संधी आपण देणार अशी मी आशा बाळगतो असेही राजू पारवे यावेळी म्हणाले. रामटेक जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नांना सोडविण्यासाठी शिवसेनेचा पुन्हा भगवा फडकविण्यासाठी मतदारांनी धनुष्यबाण चिन्हाला जिंकून देण्याचे आवाहनही राजू पारवे यांनी केले.
गोंडखैरी, १४ मैल, सेलु, परसोडी, मडासावंगीमध्ये जल्लोषात स्वागत
सावनेर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गोंडखैरी, १४ मैल, सेलु, गुमथळा, लोणारा, उपरवाही, लिंगा, सोनेगाव, कोहळी-मोहळी, सवंद्री, लोहगड-झिल्पी, बुधला, तिष्टी (बुर्दुक), तिष्टी (खुर्द), तेलगाव, नांदीखेडा, मांडवी, खुमारी, मोहपा, पिपळा की., कन्हैयाडोल, परसोडी, मडासावंगी, धापेवाडा, वरोडा, उबाळी, घोराड, कळमेश्वर-ब्राम्हणी या गावात जनसंपर्क पदयात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले. या जनसंवाद रथ यात्रेचा सावनेर विधानसभा क्षेत्रातील कळमेश्वर-ब्राम्हणी गावात रात्री झालेल्या भव्य प्रचार सभेनंतर समारोप झाला. तत्पूर्वी, प्रत्येक गावातील मुख्य चौकात आणि वस्तीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, रासपसह महायुतीच्या घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने जनसंवाद रथ यात्रेची रंगत वाढवली. प्रचार रथाचे सर्व समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. तसेच रामटेक लोकसभा निवडणुकीत राजू पारवेंच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध समाजातील बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.