अरोली :- रेवराल – खात जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या राजोली येथे राजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पूजा अर्चना, माल्य अर्पण व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून , प्रसादाचे वितरण करून त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमांस सरपंच परमधमय्या मैनेनी, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पोटभरे, ग्राम रोजगार सेवक सदानंद हरडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन भगत, राजोली टोली येथील अंगणवाडी सेविका सुशीला श्रावणकर, मदतनीस मंजुळा सोनगेरवा प्रामुख्याने उपस्थित होते.