– ॲड.बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस संपन्न
– वेळ आणि संधीचे सोने करा – दिनेश बन्सोड
वाडी :- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडी स्थित धम्मकीर्ती नगर येथे विहारातील राजग्रृह वाचनालयाला विद्यार्थीपयोगी साहित्याचे वाटप व भिख्खू संघाला फळदान-वृक्षदान देऊन बाळासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस स्वाभिमान दिवसाच्या रूपात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला जिल्हाध्यक्ष विलास वाटकर,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तदनंतर भिख्खू भन्ते महापंथ व संघाला फळदान व वृक्षदान करण्यात आले. प्रा.सुभाष खाकसे यांनी प्रस्तावनेत उद्देश व महत्व समजावून सांगितले.मुख्य कार्यक्रमात वाचनालयातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिनेश बन्सोड म्हणाले की,आज स्पर्धेचे युग आहे या युगात स्वतःला टिकवायचे असेल तर उत्तमातून उत्तम ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे आपण वेळ आणि संधीचे सोने केले तर यश निश्चित आपल्या पदरात पडेल व आवश्यक मदतीचे अभिवचन मनोगतात व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष विलास वाटकर यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसा निमित्त अभ्यासक विद्यार्थ्यांना उज्वल आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी अशोक वासेकर,राजेंद्र कांबळे यांना दान स्वरूप 10 खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.तद्नंतर उपस्थित स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेंडे,माजी उपसरपंच दिलीप मेंढे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोरगडे,मनोज भागवतकर,विजय वानखेडे, नरेशकुमार चव्हाण,प्रवीण तायडे,चंदू सोनपिंपळे,रोशन बागडे, जितेंद्र पानतावणे, राजेंद्र वासनिक,सचिन खोब्रागडे, बबलू गजभिये इत्यादी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुभाष खाकसे तर आभार राजेंद्र कांबळे यांनी मानले.