राजधानीत संत रविदास महाराज जयंती दिनी अभिवादन

 नवी दिल्ली 16 : संत रविदास महाराज जयंती दिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन करण्यात आले.  

            कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त  तथा प्रधान सचिव समीर कुमार बिस्वास  यांनी  संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त व सचिव डॉ. निधी पांडे,अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगेसहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी  व  कर्मचाऱ्यांनी  संत रविदास महाराजांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

मनपात श्री संत शिरोमणी रविदास जयंती साजरी

Wed Feb 16 , 2022
नागपूर, ता १६ :  श्री संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त म. न. पा केंद्रिय  कार्यालयातील मुख्य दालनात रविदास महाराज यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी,  उपमहापौर मनीषा धावडे, अति.आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन व रविन्द्र भेलावे  यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्या साहब बिघाणे, समाजातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com