पुणे :- २०१४मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीची जी स्थिती होती तीच अनुकूल स्थिती उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत येणार असल्याचं ज्योतिषी महंत अनिकेत शास्त्री यांचं म्हणणं आहे.
नाशिक येथील ज्योतिषी महंत अनिकेत शास्त्री यांनी ‘साम’ टीव्हीशी बोलतांना सांगितलं की, २०२४मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीमध्ये विपरित राजयोग येणार आहे. ते नरेंद्र मोदी विरोधात प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात.
‘उद्धव यांच्या ग्रहदशेचा अभ्यास केला असता येणारा काळ हा क्रांतीकारी असणार आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्धव यांच्याकडे नेतृत्व देऊ शकतात. २०२४मध्ये शनी महाराजांची उद्धव यांच्या राशीवर कृपादृष्टी असेल. त्यामुळे ८ पैकी ६ योग जुळून येणार आहेत.’ असं अनिकेत शास्त्रीनी सांगितलं.
२०१४मध्ये अशीच ग्रहस्थिती आणि कुंडली नरेंद्र मोदींची असल्याचं शास्त्री म्हणाले. मात्र पंडित वासुदेव सत्रे यांनी यांनी हा दावा खोडून काढलाय. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं सत्रे यांनी सांगितलं.