मुबलक पाणी हवे असल्यास रेन वॉटर हार्वेस्टींग करणे आवश्यकच

– परिसरातील पाण्याची पातळी वाढविणे आपल्या हातात  

– हार्वेस्टींग करण्याच्या २ पद्धती  

चंद्रपूर  :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींग मोहीम आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात युद्धस्तरावर राबविली जात असुन आपल्या परीसरातील पाण्याची पातळी वाढावी या दृष्टीने प्रत्येकाने आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा उभारावी यासाठी जनजागृती केली जात आहे.

पावसाची अनिश्चितता, वाढते तापमान व विहीर – बोअरवेलद्वारे केल्या जात असलेल्या पाण्याच्या उपस्याने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे.आज पाण्याची बचत न केल्यास पुढील काळ कठीण असणार आहे. पावसाचे पाणी हे निःशुल्क असते आणी आपल्याला काही निःशुल्क मिळाल्यास त्याची किंमत केल्या जात नाही.पाण्याची पातळी कमी आहे हे समजले तर पाणी वाचविण्याचे प्रयत्न न करता लगेच बोअरवेल खणली जाते व त्यामुळे पाण्याची पातळी अजूनच कमी होते.

मुबलक पाणी हवे असल्यास पावसाचे पाणी वाचविणे हा एकमेव उपाय आहे. याकरीता रेन वॉटर हार्वेस्टींग करणे आवश्यकच आहे.याकरीता शासनातर्फे जलशक्ती अभियान व मनपातर्फे रेन वॉटर हार्वेस्टींग अभियान राबविले जात आहे. याकरीता आवश्यक ती जनजागृती प्रसार माध्यमे,दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेज,पॅम्प्लेट्स,डेमो व्हॅन, मालमत्ताधारकांना नोटीसद्वारे करण्यात येत आहे.स्वेच्छेने काम करणाऱ्या नागरीकांची जलमित्र म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. नविन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे सक्तीचे केले गेले आहे. शहरातील सर्व बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे मनपातर्फे अनिवार्य करण्यात आले आहे.

ज्या बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना(अपार्टमेंट) रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची कारवाई सुद्धा करण्यात येत आहे.मात्र दंड न करता नागरीकांनी स्वतःहुन रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे याकरीता मनपा प्रयत्नशील आहे. प्रोत्साहन म्हणुन घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार अनुदान व मालमत्ता करात पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के सुट सुद्धा देण्यात येत आहे.याकरीता आवश्यक त्या कंत्राटदारांची यादी सुद्धा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली असुन सर्वांनी आपल्या राहत्या घरी रेन वाटर हार्वेस्टिंग करण्याचे आव्हान मनपाद्वारे करण्यात येत आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचे प्रकार –

१. जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल असेल तर – यात जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल असेल तर तुम्हाला शोषखड्डा तयार करण्याची गरज नाही.घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे एका जागेहून पाईपद्वारे खाली आणायचे व शुद्धीकरणाचे फिल्टर लावून पाणी स्वच्छ करून विहीर किंवा बोअरवेलमधे सोडणे. सदर फिल्टर हे आवश्यकतेनुसार स्वतः ला सुद्धा स्वच्छ करता येते.

२. जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल नसेल तर – जर तुमच्याकडे विहीर किंवा बोअरवेल नसेल तरच शोषखड्डा तयार करण्याची गरज आहे. यात घराच्या आकारमानानुसार शोषखड्डा तयार करण्यात येतो. घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी हे एका जागेहून पाईपद्वारे खाली आणायचे व शोषखड्यात सोडायचे.

लागणारा खर्च – रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी लागणार खर्च हा घराच्या छताच्या आकारमानानुसार तसेच फिल्टर लावून अथवा शोषखड्डा करून करावयाचे आहे त्यानुसार असतो. घराचा आकार लहान मोठा त्यानुसार खर्चातही बदल होतो.

तांत्रीक माहीती कुठे मिळेल – रेन वॉटर हार्वेस्टिंगची तांत्रीक माहीती ही कंत्राटदारांद्वारे अथवा मनपा रेन वॉटर हार्वेस्टिंग कक्ष किंवा ९०७५७५१७९०,८३२९१६९७४३ या क्रमांकावरही मिळु शकते.सदर यंत्रणा मालमत्ताधारक त्यांच्या ओळखीच्या कंत्राटदाराद्वारेही बसवु शकतात मनपाच्या कंत्राटदारांद्वारेच करणे आवश्यक नाही.

अनुदान मिळण्यास आवश्यक कागदपत्रे –

१. रेन वॉटर हार्वेस्टींगचा फॉर्म भरणे

२. आधार कार्ड

३. भरलेल्या मालमत्ता कराची पावती

४. केलेल्या कामाचे फोटो ( आधीचे व नंतरचे )

५. बँक पासबुकची प्रत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लग्नापूर्वी वर -वधूची सिकलसेल तपासणी करणे गरजेचे - डॉ शबनम खाणुनी

Mon Jun 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आई आणि वडील दोघेही सीकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यामुळे त्यांच्या अपत्यांना हा सिकलसेल चा आजार होतो त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक अथवा ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह करणे टाळावे.भावी पिढीला सिकलसेल होऊ नये म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर दोघांनीही सिकलसेल रक्ताची तपासनी करावी व सिकलसेल अपत्य जन्माला येऊ देण्याचे टाळावे असे आव्हान नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीकारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com