कामठी तालुक्यात पावसाचा हाहाकार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील गावाना पुराणे वेढण्याची शक्यता

-एकाच दिवसात कामठी तालुक्यात सरासरी 73.04 मी मी पावसाची नोंद

-भामेवाडां ग्रा प महिला सरपंचचे घर कोसळले

कामठी ता प्र 13:-मागील पाच दिवसापासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व काल पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंचचे दरवाजे उघडण्यात आले परिणामी हा जलाशय कन्हान नदीत विसर्ग झाल्याने कन्हान नदी फुगली परिणामी या नदी काठावरील कामठी तालुक्यातील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील गावाना पुराणे वेढण्याची शक्यता आहे.तर पावसाच्या पाण्याचा हाहाकार वाढल्याने ओढे ,नाल्याना पूर आला आहे .

तर ह्या ओढे नाल्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.काल रात्रीपासून झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार कोराडी 80.2 मी मी ,दिघोरी 50.8 मिमी, वडोदा 62.2 मी मी, तर कामठी 91.3 मी मी असा एकूण चारही मंडळात 292.5 मी मी पाऊस पडला असून कामठी तालुक्यात सरासरी 73.04 मी मी पाऊस पडला आहे.या मुसळधार पावसात कुठेही जीवितहानी टळली नसली तरी कामठी शहरातील आनंद नगर भागात एक घर कोसळले तर ग्रामीण भागातील भामेवाडां ग्रा प सरपंच सविता विनोद फुकट चे घर कोसळल्याने जवळपास 5 लक्ष रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पाऊस व आज कन्हान नदीला आलेल्या महापुराने कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बीडबिना, बिनासगम, गोराबाजार, छोटी आजनी, आजनी रडके, नेरी, सोनेगावराजा, चिकना, भामेवाडा यागावात पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तर कामठी लगत असलेल्या येरखेडा गावातील तिडके ले आउट परिसरात जलमय परिस्थिती निर्माण झाले असून नागरिकांचा रणाळा गावाशी संपर्क तुटला होता तसेच तिडके ले आउट रहिवाश्याना घराबाहेर पडणे शक्य नव्हते तसेच कामठी शहरातील रामगढ, आनन्द नगर, शिवशक्ती नगर, विकतुबाबा नगर , आझाद नगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून एक घर कोसळल्याची माहिती आहे तसेच भामेवाडां ग्रा प सरपंच चे घर कोसळल्याने नुकसान झाल्याची माहिती आहे तर कुंभारे कॉलोनीत सुद्धा पाणी शिरल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. तर या सर्व परिसरातील नाल्याच्या पाण्याची योग्यरीत्या निकासी न झाल्याने उलट पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याचे सांगण्यात येते,।कन्हान नदीच्या पुराने गोराबाजार, छोटी आजनी, आजनी रडके ,नेरी, भामेवाडा, केम,चिकणा गावात पुराचे नागरीकाचे घरात शिरल्याने नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूचे मोठे नुकसान झाले तसेच भामेवाडा गावात एक घर कोसळले , सुदैवाने कुठेही जीवितहानी नसून नदी काठावरील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसांन झाले आहे.
कामठी तालुक्यातील नाग नदी तुडुंब भरल्याने नदीवरील पावनगाव पुलिया पूर्णपणे बुडाला असल्याने या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाहतूक बंद होती. तर पावनगाव पुलिया पाण्याखाली आल्याने पावनगाव गावाचा संपर्क तुटला होता.शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले असून सतत मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढे व नाले तुडुंब भरुन वाहले , नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, कामठी तालुक्यात प्रचंड पावसाचा हाहाकार झाला असून जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती होती,शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली असून शेतातील खरीप शेतीपिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाल्याची स्थिती आहे.शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करावे.अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत.झालेल्या मुसळधार पावसामुळे तहसीलदार अक्षय पोयाम, बिडीओ अंशुजा गराटे व आदी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत नागरिकांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.तसेच पुराचा धोका असलेल्या नागरिकांना खबरदारी घेत सतर्कतेचा इशारा दिला.तर मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी कामठी शहरातील पुरसदृश्य स्थिती पाहत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गुरू पौर्णिमा निमित्त एक दिवसीय सामुहिक ध्यान साधना शिबीर संपन्न

Wed Jul 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठीता प्र 13 :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेल्या ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे एक दिवसीय सामुहिक ध्यान साधना शिबीराचे आयोजन आज बुधवार दिनांक 13/07/2022 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 4:00 वाजे पर्यंत करण्यात आले होते. या एक दिवसीय ध्यान साधना शिबीरात मोठया प्रमाणात साधकांनी सहभाग घेवून शिबीराचा लाभ घेतला. ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com