अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

– अजनीसाठी 297.8 कोटी तर नागपूर जंक्शन साठी 589 कोटी रुपये निधी

 – काटोल रेल्वेस्टेशन साठी 23.3कोटीं चा निधी*

 – गोधनी, इतवारी, कामठी, नरखेड जं. स्टेशनचाही होणार विकास

 – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती

– आमदार चरणसिंग ठाकूर यांचे कडून रेल्वे मंत्र्याचे आभार व्यक्त

 नागपूर-काटोल :- भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील अजनी, नागपूर जंक्शन,गोधनी, काटोल, कामठी, इतवारी , नरखेड जं. स्टेशनचाही विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी काटोल चे आमदार चरण सिंह ठाकूर यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

सोबतच नागपूर जिल्हा भा ज पा अध्यक्ष सुधाकर कोहळे व भा ज पा जिल्हा महामंत्री दिनेश ठाकरे यांनी ही रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचें आभार मानले आहेत.

या पुनर्विकासात नागपूर जिल्ह्यातील स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. अजनी स्टेशन (297.8 कोटी), नागपूर जं. (589 कोटी), गोधनी स्टेशन (29 कोटी), काटोल स्टेशन (23.3 कोटी), कामठी स्टेशन (7.7 कोटी), नरखेड जं. स्टेशन (37.6 कोटी),नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जं. (17.4 कोटी) निधी मिळणार आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

राज्यातील इतर भागातील ही रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.

▪️या रेल्वे स्थानकांचा होणार विकास

जालना (189 कोटी), छत्रपती संभाजीनगर (241 कोटी), रोटेगाव (12 कोटी), अहिल्यानगर (31 कोटी), भायखळा (35.5 कोटी), चिंचपोकळी (52 कोटी), चर्नी रोड (23 कोटी), छत्रपती शिवाजी महाराज टमिनल (1813 कोटी), ग्रॅट रोड (27 कोटी), लोअर परेल (30 कोटी), मरिन लाईन्स (27.7 कोटी), सॅण्डहर्स्ट रोड (16.4 कोटी), मुर्तिजापूर स्टेशन (13 कोटी), बडनेरा (36.3 कोटी), बारामती (11.4 कोटी), दौंड (44 कोटी), केडगाव (12.5 कोटी), परळी वैजनाथ (25.7 कोटी), भंडारा रोड (7.7 कोटी), गोंदिया 40 कोटी), तुमसर रोड (11 कोटी), टिटवाळा (25 कोटी), शेगाव (29 कोटी), बल्लारशाह (31.4 कोटी), चंद्रपूर (25.5 कोटी), चांदा फोर्ट (19.3 कोटी), धुळे (9.5 कोटी), लासलगाव (10.5 कोटी), मनमाड (45 कोटी), नगरसोल (20.3 कोटी), नांदगाव (20 कोटी), आमगाव (7.8 कोटी), वडसा (20.5 कोटी), हातकंणगले (6 कोटी), हिमायतनगर (43 कोटी), हिंगोली डेक्कन (21.5 कोटी), किनवट (23 कोटी), चाळीसगाव (35 कोटी), अंमळनेर (29 कोटी), धरणगाव (26 कोटी), पाचोरा जं. (28 कोटी), दिवा (45 कोटी), मुंब्रा (15 कोटी), शहाड (8.4 कोटी), कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (43 कोटी), लातूर (19 कोटी), जेऊर (20 कोटी), कुर्डूवाडी जं (20 कोटी), फलटण (1 कोटी), वाठर (8 कोटी), आकुर्डी (34 कोटी), चिंचवड (20.4 कोटी), देहू रोड स्टेशन (8.05 कोटी), तळेगाव स्टेशन (40.34 कोटी), मालाड स्टेशन (12.32 कोटी), कुर्ला जं. स्टेशन (28.81 कोटी), कांजुरमार्ग स्टेशन (27 कोटी), विद्याविहार स्टेशन (32.8 कोटी), विक्रोळी स्टेशन (19 कोटी), जोगेश्वरी स्टेशन (119 कोटी), माटुंगा स्टेशन (17.3 कोटी), परळ स्टेशन (19.4 कोटी), प्रभादेवी (21 कोटी), वडाळा स्टेशन (23 कोटी), भोकर स्टेशन (11.3 कोटी), धर्माबाद स्टेशन (30 कोटी), मुखेड जं.स्टेशन (23 कोटी), उमरी स्टेशन (8 कोटी), देवळाली स्टेशन (10.5 कोटी), इगतपुरी स्टेशन (12.5 कोटी), धाराशिव स्टेशन (22 कोटी), गंगाखेड स्टेशन (16 कोटी), मनवथ रोड स्टेशन (12 कोटी), परभणी जं. स्टेशन (26 कोटी), परतूर स्टेशन (23 कोटी), पूर्णा जं. स्टेशन (24 कोटी), सेलू स्‍टेशन (23.2 कोटी), हडपसर स्टेशन (25 कोटी), कराड स्टेशन (12.5 कोटी), सांगली स्टेशन (24.2 कोटी), लोणंद जं.स्टेशन (10.5 कोटी), सातारा स्टेशन (34.3 कोटी), बेलापूर स्टेशन (32 कोटी), कोपरगाव स्टेशन (30 कोटी), सेवाग्राम स्टेशन (18 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी), हिंगणघाट स्टेशन (22 कोटी), पुलगाव स्टेशन (16.5 कोटी), उरूली स्टेशन (13 कोटी), वाशिम स्टेशन (20.3 कोटी), मलकापूर स्टेशन (19 कोटी), नांदुरा स्टेशन (10.6 कोटी), रावेर स्टेशन (9.2 कोटी), सावदा स्टेशन (8.5 कोटी), दुधनी स्टेशन (22 कोटी), पंढरपूर स्टेशन (40 कोटी), सोलापूर स्टेशन (56 कोटी), नंदूरबार स्टेशन (15 कोटी) आणि पालघर स्टेशन (17.5 कोटी) निधी मिळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पारधी समाजाचा तो तरुण सरपंच बनला आणि खूर्चीवर बसण्यापूर्वीच...

Mon Apr 14 , 2025
– आदिवासी पारधी विकास परिषदेत उद्या मांडणार व्यथा – ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली उद्या रवि भवनात परिषदेचे आयोजन नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील उमरेड पाचगाव जवळील चांपागावमध्ये पंचायत समितीत तो पहिल्यांदा अपक्ष उमेदवार निवडून आल्यावर, गावाचा सर्वात तरुण सरपंच बनला मात्र,खूर्चीवर बसण्या पूर्वीच गावातील प्रस्थापित समाजातील लोकांनी शिव्याने त्याचे स्वागत केले,आता एक पारधी समाजाचा मुलगा आम्हाला पंचायती राज शिकवणार का?आमच्यावर राज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!